Assembly Election Results: मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपा बहुमताच्या दिशेने, काँग्रेस पिछाडीवर

0

मुंबई,दि.३: Assembly Election Results: मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये थेट लढत असून, २०२४ च्या लोकसभेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपा बहुमताच्या दिशेने

मध्य प्रदेशमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपाने १३५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस केवळ ६४ जागांवर आघाडीवर आहे. तर राजस्थानमध्ये अटीतटीची लढत होत असून, इथे भाजपा ८२ आणि काँग्रेस ७४ जागांवर आघाडीवर आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here