विधानसभा निवडणूक निकालावरून अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा 

0

नवी दिल्ली,दि.5: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच याबाबत लवकरच मोठा खुलासा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाले. भाजपाला 132 जागांवर विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी अनेक मतदारसंघात मतदारांची नावे वाढवली आहेत असा आरोप केला आहे. 

भाजपने महाराष्ट्र आणि हरयाणाच्या विधानसभा निवडणुका फसवणूक करून जिंकल्या आहेत. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि त्याची पोलखोल मी देशासमोर करणार, असा बॉम्ब आज आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी फोडला. दिल्लीतही भाजपकडून तसेच षड्यंत्र रचले जात आहे मात्र ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे केजरीवाल यांनी बजावले.

दिल्ली विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना भाजपने दिल्लीतही खूप मोठय़ा प्रमाणात मते कापण्याचे षड्यंत्र रचले आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आले आहेत. त्याचे साक्षीदारही आहेत, असे केजरीवाल यांनी नमूद केले. केजरीवाल यांनी एक्सवरूनही एक पोस्ट केली असून त्यात अनेक खळबळजनक दावे केले आहेत. भाजपच्या लोकांकडून मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज दाखल केले जात आहेत. अशा लोकांना आम्ही रंगेहाथ पकडले आहेत त्याची तपशीलवार माहिती साक्षीपुराव्यासह मी देणार आहे, असा इशारा केजरीवाल यांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here