अरविंद केजरीवाल यांनी राम मंदिराच्या कार्यक्रमाबाबत भूमिका केली स्पष्ट

0

नवी दिल्ली,दि.17: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राम मंदिराच्या कार्यक्रमाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या कार्यक्रमासंदर्भात APP चे अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, त्यांना अद्याप यासंदर्भात औपचारिक निमंत्रण मिळालेले नाही.

केजरीवाल म्हणाले की, राम मंदिराच्या कार्यक्रमाचे अंतिम निमंत्रण मिळालेले नाही. मात्र ते 22 जानेवारीनंतर आई-वडील आणि पत्नीसह अयोध्येला जाणार आहेत. माझ्या आई-वडिलांनाही अयोध्येला जायचे आहे. असे केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल म्हणाले की, मला श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे पत्र मिळाले आहे. पण मला सांगण्यात आले की प्राण प्रतिष्ठा समारंभासाठी वैयक्तिक आमंत्रण देखील पाठवले जाईल, जे अद्याप मिळालेले नाही. सुरक्षेच्या कारणास्तव फक्त निमंत्रित व्यक्तीला एकट्यालाच तिथे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. या कारणास्तव मी 22 जानेवारीनंतर अयोध्येला जाणार आहे. केजरीवाल यांना २२ जानेवारीचे निमंत्रण पाठवण्यात आल्याचे विश्व हिंद परिषदेचे म्हणणे आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here