नवी दिल्ली,दि.८: यावेळी दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होताना दिसत आहे. आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी त्यांचा ३१८६ मतांनी पराभव केला.
आम आदमी पार्टीचे मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला आहे. भाजपचे तरविंदर सिंह मारवाह यांनी त्यांचा पराभव केला. दिल्लीतील जंगपुरा विधानसभा जागेवर भाजपचे तरविंदर सिंह मारवाह यांनी विजय मिळवला आहे.