‘आम्ही राजा-महाराजा आहोत का?’ मुख्यमंत्र्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक रोखल्याने मुख्यमंत्री संतापले

0

दि.16: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Assam Chief Minister Himanta Biswa Sarma) आज या भागात एका रस्त्याच्या पायाभरणीसाठी आले होते. यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग 37 वर गुमोठागावाजवळ वाहतूक कोंडी झाली होती. जाममध्ये वाहने आणि रुग्णवाहिका अडकल्याचे पाहून मुख्यमंत्री सरमा यांनी जिल्हाधिकारी नागाव यांना फटकारले.

त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला फटकारले आणि म्हणाले की ही वाहतूक कोंडी का झाली, गाड्या का थांबवल्या आहेत, कोणी राजा महाराज येणार आहेत का? यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या जिल्हाधिकऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांनी तात्काळ रस्ता वाहतुकीला मोकळा करून अडकलेली वाहने बाहेर काढली. एक रुग्णवाहिकाही यामध्ये अडकली होती.

एजन्सीच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, मी माझ्या दौऱ्यात लोकांना गैरसोय होऊ देऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले होते. असे असतानाही माझ्यासाठी वाहतूक बंद करण्यात आली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना खडसावले आहे. राष्ट्रीय महामार्ग 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ ठप्प होता. रुग्णवाहिकांसह इतर अनेक वाहने अडकून पडली. लोकांना त्रासाला सामोरे जावे लागले. आजच्या आसाममध्ये ही व्हीआयपी संस्कृती मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here