apps banned in india: भारत सरकारने तातडीने बॅन केले 232 लोन आणि बेटिंग ॲप्स

0

नवी दिल्ली,दि.5: apps banned in india: भारत सरकारने पुन्हा एकदा चीनी ॲपवर डिजिटल सर्जिकल स्ट्राईक केला आहे. chinese apps banned आता सुरक्षेचा हवाला देत सरकारने चीनी लिंक असलेल्या 200 हून अधिक ॲप्सवर बंदी घातली आहे. या ॲप्समध्ये 138 बेटिंग ॲप्स आणि 94 लोन ॲप्सचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या ॲप्सवर कारवाई केली आहे.

तात्काळ आणि आपत्कालीन आधारावर बंदी | apps banned in india

गृह मंत्रालयाकडून माहिती मिळाली आहे की इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) या चीनी लिंक्ड ॲप्सवर तात्काळ आणि आपत्कालीन आधारावर बंदी घालण्याची आणि ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

आयटी कायद्याच्या कलम 69 अंतर्गत ॲप्सवर बंदी | chinese apps banned

एकूण 232 ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. आयटी कायद्याच्या कलम 69 अंतर्गत या ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला याची माहिती दिली होती. त्यानंतर या ॲप्सवर कारवाई करण्यात आली. 

ॲप्स थर्ट पार्टी वेबसाइटवर उपलब्ध
 
स्मार्टफोनवर डाउनलोड करण्यासाठी बहुतेक ॲप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध नाहीत, पण थर्ड पार्टी लिंक किंवा वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकतात. अनेक ॲप्स थेट सोशल मीडिया साइटवरून ऑनलाइन देखील प्ले केले जाऊ शकतात. यापैकी अनेक ॲप्स क्रिप्टोकरन्सीमध्ये पेमेंट स्वीकारतात. 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयने म्हटले की, भारतातील बहुतेक भागांमध्ये बेटिंग आणि जुगार बेकायदेशीर आहे. याची जाहिरात करण्यावरही ग्राहक संरक्षण कायदा 2019, केबल टीव्ही नेटवर्क नियमन कायदा 1995 आणि आयटी नियम 2021 अंतर्गत बंदी आहे. मंत्रालयाने ऑनलाइन जाहिरात कंपन्यांनाही भारतीय प्रेक्षकांना अशा जाहिराती न दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे अनेक लोकांची आर्थिक आणि सामाजिक-आर्थिक स्थिती बिघडू शकते. या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here