या राज्य सरकारचा निर्णयचे होतेय कौतुक, प्रत्येक कुटुंबाला 3 गॅस सिलेंडर मोफत

0

पणजी,दि.५: महागाईने होरपळलेल्या जनतेला दिलासा देणारा निर्णय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी घेतला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) वाढत्या किमतीमुळे सामान्य जनतेचे जिणे मुश्किल झाले आहे. अशातच जनतेला दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला. त्यानुसार, गोव्यातील प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळत आहेत. 

गोवा सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जाहीरनाम्यात गॅस सिलेंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तताच सरकारने केली आहे. महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला गोवा सरकारने दिलासा दिल्यानंतर आता इतर राज्यातही मोफत गॅस सिलेंडरची मागणी होत आहे. 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. नवीन आर्थिक वर्षापासून भाजपच्या जाहीरनाम्याीतल घोषणेनुसार नागरिकांना वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. गोवा सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर, गोवा सरकारने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून महाराष्ट्र सरकारनेही असा निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here