सोलापूर,दि.7: भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पूर्वची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने जाहीर केलेल्या कार्यकारिणीत विकास वाघमारे यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी टाकली आहे. विकास वाघमारे यांच्याकडे यापूर्वी भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी होती.
त्या पदावर असताना आणि राज्यात भाजपा विरोधात असताना त्यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे आणि संघटनात्मक कामामुळे पक्षात त्यांचे स्थान अजून भक्कम झाले, ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनात महाविकासआघाडी व तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळून निषेध केलेले आंदोलन असो, नाहीतर आरोग्य भरती परीक्षेत घोटाळा झाल्याने तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन असो अशी आंदोलने त्यांनी केली होती. विद्यार्थी दशेत त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही सक्रिय काम केले आहे. मोहोळ तालुक्यातील वाघोली या ग्रामपंचायतचे बिनविरोध सदस्य म्हणूनही ते निवडून आले आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासोबतच प्रसारमाध्यमावर रोखठोक आणि अभ्यासू भूमिका मांडण्यासाठी त्यांची ओळख आहे. अगदी काळात आणि कमी वयात त्यांना भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक दृष्टीने अत्यंत महत्वाची जबाबदारी असलेल्या जिल्हा सरचिटणीस पदावर त्यांची नियुक्ती केल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. माळशिरसचे आमदार रामभाऊ सातपुते यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे. या निवडीनंतर जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, आमदार रामभाऊ सातपुते, आमदार सुभाष देशमुख, प्रदेश सदस्य शहाजी पवार यांच्यासह भाजपा व मित्रपक्षाच्या जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
सामान्य कार्यकर्त्याला न्याय भाजपातच मिळतो
भाजपा हा सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे. माझ्यासारख्या अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला आणि तेही वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी जिल्ह्याच्या सरचिटणीस पदावर बसविण्याची दानत फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच आहे. हे वर्षे निवडणुकांचे आहे, आगामी काळात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जात, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेत, नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी समन्वय ठेवत निश्चितपणाने काम करेन, अगदी प्रामाणिक काम करत पक्षनेतृत्वाने दिलेल्या संधीचे सोने करेन.
विकास वाघमारे
जिल्हा सरचिटणीस, भाजपा सोलापूर पूर्व