Appasaheb Jadhav Vs Sushma Andhare: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांचा सुषमा अंधारेंच्या कानशिलात मारल्याचा‎ दावा

0

बीड,दि.१९: Appasaheb Jadhav Vs Sushma Andhare: ठाकरे गटाकडून राज्यभरात काढण्यात येत असलेल्या महाप्रबोधन यात्रेचे नेतृत्त्व करत असलेल्या सुषमा अंधारे यांच्यावर बीडमधील जिल्हाप्रमुखाने गंभीर आरोप केले होते. बीड‎ शिवसेना ठाकरे गटाचे‎ जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव‎ (Appasaheb Jadhav) यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून‎ ‎ ‘होय, मी सुषमा‎ ‎ अंधारेंच्या दोन‎ ‎ कानशिलात‎ ‎ लगावल्या, त्या‎ ‎ कार्यकर्त्यांकडून‎ ‎ पैसे मागत‎ ‎ आहेत, माझे‎ ‎ पद विक्री‎ करायला निघाल्या आहेत,’ असा‎ आरोप केला. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मात्र‎ मारहाणीचा दावा फेटाळला आहे.‎ बीडमध्ये २० मे रोजी‎ शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची‎ ग्रामीण महाराष्ट्राची समारोप सभा‎ आहे. खा. संजय राऊत, सुषमा‎ अंधारे यांची या सभेला उपस्थिती‎ ‎ ‎ असणार आहे. याची तयारी सध्या‎ सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी सुषमा‎ अंधारे या सभेच्या मैदानाची व‎ तयारीची पाहणी करत असताना‎ जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व‎ अंधारे यांच्यात वाद झाला. स्वतः‎ जाधव यांनी याबाबत एक‎ व्हिडिओ केला आहे.

Appasaheb Jadhav Vs Sushma Andhare | आप्पासाहेब जाधव यांचा गंभीर आरोप

सुषमा अंधारे या पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत असल्याचा दावा ठाकरे गटाचे बीडमधील जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला होता. यामुळे आमच्यात भांडण झाले, त्यावेळी मी सुषमा अंधारे यांच्या दोन चापटा लगावल्या, असे आप्पासाहेब जाधव यांनी जाहीरपणे सांगितले होते. आप्पासाहेब जाधव यांचा हा दावा सुषमा अंधारे यांनी फेटाळला असला तरी या प्रकाराची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती.

जाधव‎ म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून‎ सुषमा अंधारे येथील कार्यकर्त्यांना‎ ‎ब्लॅकमेल करून विविध वस्तू‎ मागत आहेत. त्यांच्या परळीतील‎ कार्यालयासाठी अनेक‎ कार्यकर्त्यांनी लेकराबाळाच्या‎ तोंडातला घास काढून त्यांना‎ विविध वस्तू दिल्या. आम्ही काही‎ देण्यास नकार दिला की आमचे‎ निगेटिव्ह वार्तांकन उद्धव‎ साहेबांकडे करीत होत्या.‎ यासंदर्भात मी स्वतः उद्धव‎ साहेबांना थेट बोललो. त्यांच्या‎ अशा वागणुकीच्या तक्रारीदेखील‎ केल्या. मात्र तरीही अंधारे यांचा हा‎ प्रकार सुरूच होता. आज सभा‎ स्टेजची पाहणी करण्यासाठी‎ आम्ही जेव्हा गेलो त्या वेळी अंधारे‎ यांना मी बाजूला घेऊन या‎ प्रकाराबद्दल जाब विचारला. त्यांना‎ मी म्हणालो, तुम्ही असे पैसे घेऊन‎ किंमत नसलेल्या कार्यकर्त्यांना का‎ पदे वाटत आहात? त्यावरून‎ त्यांची आणि माझी बाचाबाची‎ झाली. त्यामुळे रागाच्या भरात मी‎ त्यांच्या कानाखाली ठेवून दिली. या‎ प्रकारानंतर अप्पासाहेब जाधव‎ आणि उपजिल्हाप्रमुख गणेश‎ वरेकर यांच्यातही बाचाबाची‎ झाली. त्यात वरेकर यांनी‎ अप्पासाहेब जाधव यांची स्कॉर्पिओ‎ गाडी फोडली.‎


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here