Omicron Variant: भारतात आणखी एक Omicron चा रुग्ण आढळला, झिम्बाब्वेहून आला होता परत

0

Omicron Variant: कर्नाटकामध्ये Omicron चे दोन रुग्ण आढळल्यानंतर आता गुजरातमध्ये एक ओमिक्रॉन रुग्ण आढळला आहे.

सोलापूर,दि.4: कोरोना (Corona) विषाणूचा नवीन प्रकार असलेल्या ओमिक्रॉन (Omicron) संसर्गाची तिसरे प्रकरण भारतात समोर आले आहे. झिम्बाब्वेहून गुजरातमधील जामनगरमध्ये परतलेल्या एका तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तरुणाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. गुजरातचे आरोग्य आयुक्त जय प्रकाश शिवहरे यांनी याची पुष्टी केल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

जामनगर येथील एका 72 वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर त्यांचा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला होता. यानंतर, आज त्यांना ओमिक्रॉनची लागण झाल्याची पुष्टी झाली. ओमिक्रॉनची लागण झालेली ही व्यक्ती जिथे राहते त्या ठिकाणाभोवती एक सूक्ष्म-कंटेनमेंट झोन तयार करण्यात आला आहे. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांची चाचणी केली जात आहे.

याआधी भारतात आणखी दोन प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये एका 46 वर्षीय डॉक्टरचा समावेश आहे, ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यांचा बाहेरील देशात प्रवासाचा इतिहासही नव्हता आणि त्यांना ताप, अंगदुखी अशी कोणतीही लक्षणे होती. दुसरी व्यक्ती दक्षिण आफ्रिकेची नागरिक आहे, जो कोविड-19 चा निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन भारतात आला होता, परंतु येथे तो कोविड पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी झाली, जी नंतर ओमिक्रॉन प्रकार असल्याचे निष्पन्न झाले.

ANI नुसार, गुजरातच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त आरोग्य सचिव मनोज अग्रवाल म्हणाले, “आम्ही त्यांना अलगीकरणामध्ये मध्ये ठेवले आहे आणि त्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रॅकिंगची काळजी घेतली जात आहे. भारताने सर्व परदेशी प्रवाशांची चाचणी आणि पाळत ठेवण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. विशेषत: जोखीम श्रेणीतील देशांमधून येणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. Omicron प्रकार प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here