ठाकरे गटाचा आणखी एक आमदार नगरसेवक शिंदे गटात जाणार?

0

मुंबई,दि.17: ठाकरे गटाचा (Thackeray Group) आणखी एक आमदार नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेचे 40 आमदार व 13 खासदार शिंदे गटात गेले. राज्यात सत्तांतर झाले. अशातच आणखी एक आमदार व नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. महापुरूषांचा अवमान, राज्यातील प्रकल्प बाहेर गेले, शेतकरी, बेरोजगारी, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अशा विविध प्रश्नांवर आज महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चाचे आयोजन केले होते.

हेही वाचा प्रकाश आंबेडकर यांचे उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठं वक्तव्य

ठाकरे गटाचे आमदार नगरसेवक मोर्चाला गैरहजर

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासह अनेक संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. एकीकडे महाविकास आघाडीचा महामोर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मुंबईत मोठे खिंडार पडलं आहे. महामोर्चात सहभागी न होता ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर आणि नगरसेवक अनिल पाटणकर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्यासोबत एका स्थानिक कार्यक्रमात उपस्थित झाल्याचे दिसून आलं आहे.

ठाकरे गट

आमदार प्रकाश फातर्फेकर शिंदे गटात जाणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेनेत बंड करुन 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर खासदारांनीही शिंदे यांची साथ देत ठाकरेंना धक्का दिला. सरकार स्थापन केल्यानंतर ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि नेते मंडळी शिंदे गटात सहभागी होत आहे. यातच आता आणखी एक आमदार शिंदे गोटात सहभागी होणार असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. महाविकास अघाडीच्या महामोर्चात सहभागी न होता ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर आणि नगरसेवक अनिल पाटणकर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या सोबत एका स्थानिक कार्यक्रमात उपस्थित होते.

चेंबूरमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे उद्धघाटन कार्यक्रमात ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर आणि नगरसेवक अनिल पाटणकर उपस्थित झाल्यामुळे राजकिय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झालीय.

सोलापुरातून मोर्चासाठी कार्यकर्ते दाखल

महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये राज्यभरातील शिवसैनिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. डाव्या संघटनांनी देखील महाविकास आघाडीच्या महामोर्चाला पाठिंबा दिला. मुंबईमध्ये ठाणेसह सोलापुरातून देखील डाव्या संघटनांचे कार्यकर्ते दाखल झाले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोर्चात सामील झाले. आपापल्या पक्षाचे झेंडे आणि निषेध फलक घेऊन कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता. जागोजागी पोलिसांची पथक तैनात करण्यात आली होती. ड्रोनद्वारे पोलिसांनी मोर्चावर नजर होती. मोर्चात SRPFच्या वाढीव तुकड्यांचाही बंदोबस्त लावण्यात आला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here