Anil Deshmukh | अनिल देशमुखांना 100 कोटी वसुली प्रकरणात अखेर जामीन मंजूर

Anil Deshmukh News | CBI च्या भूमिकेमुळे निर्णयाला 10 दिवसांची स्थगिती

0

मुंबई,दि.12: Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना (Anil Deshmukh News) 100 कोटी वसुली प्रकरणात अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार आणि वसुली प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने हा जामीन मंजूर केला आहे. 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये देशमुखांवर खोटे आरोप केल्याचा युक्तीवाद देशमुख यांच्या वकिलांनी केला.

हेही वाचा विजेची तार प्लॅटफॉर्मवर उभ्या टीसीवर पडली, धक्कादायक घटनेचा Video व्हायरल

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार आणि वसुली प्रकरणात जामीनासाठी युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी आज याबद्दल निकाला दिला आहे. अनिल देशमुख यांनी केलेल्या जामीन अर्जाला सीबीआयनं विरोध केला असला तरी देशमुखांच्या वकिलांनीही कोर्टात सुनावणी दरम्यान युक्तिवाद दरम्यान तपास यंत्रणेकडे कुठला ठोस पुरावा नसल्याचा जोरदार दावा केला होता.

Anil Deshmukh | Anil Deshmukh finally granted bail in 100 crore recovery case

Anil Deshmukh | 10 दिवस अनिल देशमुख यांना जेलमध्येच थांबावे लागणार

या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेनी दिलेला जबाब विश्वासहार्य नाही, अनिल देशमुख यांचा वाढतं वय, त्यांना असलेले आजार, सुनावणी दरम्यान अनेक वेळा ते चक्कर येऊन पडले. हे सर्व लक्षात त्यांना जामीन देण्यात यावा अशीही विनंती कोर्टाला केली आहे. ईडीकडे दाखल गुन्ह्यात अनिल देशमुख यांना आधीच जामीन मिळाला आहे. अखेर आज हायकोर्टाने अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला मंजुरी दिली आहे. अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यामुळे सीबीआयला मोठा धक्का बसला आहे. सीबीआयने या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेणार आहे. यासाठी 10 दिवसांचा अवधी मागितला आहे. कोर्टाने सीबीआयची ही मागणी मान्य केली आहे. जामिनावर स्थगिती दिली आहे. त्यामुळे 10 दिवस देशमुख यांना जेलमध्येच थांबावे लागणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here