Accident: शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसचा अपघात, शिक्षक जागीच ठार

0

सोलापूर,दि.21: शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसचा अपघात (Accident) झाला आहे. माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे थांबलेल्या टेम्पोला सहलीच्या एस टी बसने धडक दिल्याने अपघात होऊन एक शिक्षक जागीच ठार झाला तर एक शिक्षक जखमी झाला. या अपघातात विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे सहाच्या दरम्यान घडला.

अपघात झाला तेव्हा बसमध्ये शिक्षक आणि विद्यार्थीही होते. अपघातावेळी बसमध्ये शिक्षक आणि विद्यार्थीही उपस्थित होते. अवघड वळणावर टेम्पोला बसची धडक बसून ही दुर्घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एस टी क्रमांक एम एच 14 बी टी 4701 ही बस सहल घेऊन गेली होती. या अपघातात शिक्षक रमाकांत शिवदास शिरसाठ यांना डोक्याला किरकोळ जखम झाली आहेत शिक्षक बाळकृष्ण काळे जागेवरच मयत झाले जखमी व मयताला 108 अकलूज 0742 या ॲम्बुलन्सने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एका शिक्षकाचा जागीच मृत्यू

आज पहाटे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज जवळ हा अपघात घडला. शैक्षणिक सहलीची बस आणि टेम्पोचा अपघात झाला. शालेय विद्यार्थ्यांची सहल कोकण दर्शनासाठी गेली होती. अपघात झाला तो आयशर टेम्पो होता. या टेम्पोमधून बांबूची वाहतूक करण्यात येत होती. हा टेम्पो पंक्चर झाल्याने एका अवघड वळणावर थांबला होता. याच अवघड वळणावर टेम्पोला सहलीच्या बसची धडक बसली आणि अपघात घडला अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here