Amravati Crime: विद्यार्थीनी व प्राध्यापकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस

0

अमरावती,दि.26: Amravati Crime: विद्यार्थीनी व प्राध्यापकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शिक्षक म्हटले की समाज घडवणारा, भावी पिढी सुसंस्कृत घडवणारा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र अनेकदा शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या घटना घडतात. शिक्षकावर विद्यार्थ्यांचं भविष्य घडविण्याची जबाबदारी असते असं आपण म्हणतो. आईवडिलानंतर शिक्षकाला गुरू मानलं जातं.

शिक्षकच विद्यार्थ्याच्या आयुष्याला आकार देण्याचं काम करतात. शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नात सर्वश्रेष्ठ मानलं जातं. याच नात्याला अमरावती जिल्ह्यात काळीमा फासल्याची घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील एका महाविद्यालयातील विद्यार्थीनीकडे प्राध्यपकाने थेट शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

विद्यार्थीनी व प्राध्यापकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस | Amravati Crime

अमरावती येथील एका नामांकित महाविद्यालयात विद्यार्थी व प्राध्यापकाच्या नात्याला कलंक फासल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालयातच शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय मागासवर्गीय विद्यार्थीनीकडे विश्वास जाधव नामक प्राध्यापकाने शरीर सुखाची मागणी केली. माझी मसाज करून दे अशीही मागणी या प्राध्यापकाने केली. घडला प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी नराधम प्राध्यापक विश्वास जाधव याला अटक केली आहे. आरोपी प्राध्यापकावर पोस्कोसह अट्रोसिटीअंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here