मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांची गाडी फोडली

0

अकोला,दि.30: मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हणत टीका केली होती. अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे. मनसे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही वेळासाठी वातावरण तापलं होतं. दरम्यान, अमोल मिटकरी यांनी यावर व्यक्त होताना आपण अशा धमक्यांना भीक घालत नाही असं म्हटलं आहे. 

राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. ‘अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणं भरली आहेत’, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) चे नेते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर सुपारीबहाद्दर असल्याचा पलटवार केला होता.

अजित पवारांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे अशी जहरी टीका अमोल मिटकरी यांनी केली होती. तसंच राज ठाकरेंना सुपारीबहाद्दर म्हटलं. 

अमोल मिटकरी अकोला शहरातील विश्रामगृहात आले असता मनसैनिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि दरवाजाला लाथ मारून आत प्रवेश केला. यावेळी अमोल मिटकरी यांच्या समर्थकांसोबत मनसैनिकांची बाचाबाची झाली. यामुळे तणाव निर्माण झाला होता. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. यानंतर अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड सुद्धा करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here