तुम्ही शकूनी मामासारखे फासे टाकत राहा, कुरुक्षेत्रावरील युद्ध श्रीकृष्ण जिंकून देणार: अमोल मिटकरी

0

दि.१०: २४ वर्षांनंतर आज राज्यात पुन्हा राज्यसभेची निवडणूक होत आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात आज जोरदार चर्चा आहे ती राज्यसभा निवडणुकीची. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा निष्फळ ठरली. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून निरनिराळे दावे केले जात आहेत. विशेषत: सहाव्या जागेवर नेमका कोणता उमेदवार निवडून येणार? याची देखील उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या असताना त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपाच्या अध:पतनाचा इशारा दिला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या राज्यसभा विजयाचे मोठे गिफ्ट मिळेल, असा खोचक टोला लगावला आहे. 

सत्ताधारी महाविकास आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून निरनिराळे दावे केले जात आहेत. विशेषत: सहाव्या जागेवर नेमका कोणता उमेदवार निवडून येणार? याची देखील उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, शरद पवारांवर मुख्यमंत्री नाराज नसून, महाविकास आघाडीमध्ये एकमत असल्याचा दावा केला आहे. यातच आता अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

शकुनी मामा

महाविकास आघाडी सरकारमध्ये आज चारही जागेवर आमचे उमेदवार निवडून येतील. भाजपाकडून काही बातम्या पेरल्या जात आहेत की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वितुष्ट आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. महाविकास आघाडीचे राज्यसभेचे सर्व उमेदवार निवडून येतील. चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाचे हे सर्वांत मोठे गिफ्ट सायंकाळपर्यंत मिळेल, असा खोचक टोला मिटकरी यांनी लगावला. तसेच भाजपने अनिल बोंडे यांची अवस्था महाभारतातील शकुनी मामासारखी करुन ठेवली आहे. तुम्ही फक्त आपल्या गटार वाणीतून “भांजे” म्हणत फक्त पासे टाकत राहा कुरुक्षेत्रावरील युद्ध श्रीकृष्ण जिंकून देणार, या शब्दांत मिटकरी यांनी टीकास्त्र सोडले. 

अफवा पसरवल्या जात आहेत

“महाविकास आघाडी सरकारमध्ये आज चारही जागेवर आमचे उमेदवार निवडून येतील. भाजपाकडून काही बातम्या पेरल्या जात आहेत की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वितुष्ट आहे. त्यात कोणतंही तथ्य नाही. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी नव्या जोमाने हे उमेदवार उभे केले आहेत. ते निवडून येतील”, असं मिटकरी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशामध्ये म्हणाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here