मुंबई,दि.८: Amit Thackeray On Politics: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मोठं विधान केले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली. राज्यात सत्तांतर झाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आता अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजित पवारांच्या बंडानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावेत अशी चर्चा सुरु आहे. यावर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हणाले अमित ठाकरे? | Amit Thackeray On Politics
“दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत बसणं गरजेचं आहे,” अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ‘एक सही संतापाची’ या मोहिमेचं दहिसर येथे आयोजन केलं होते. तेव्हा अमित ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
अमित ठाकरे म्हणाले, “मला वाटतं, दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत बसणं गरजेचं आहे. ते म्हणजे राज ठाकरे… आम्ही या राजकीय चिखलात नाही. याचा मला वडिलांवर अभिमान आहे. राज ठाकरेंनी आम्हाला येथेपर्यंत पोहचवलं आहे. यापुढील निर्णयही राज ठाकरेच घेतील.”
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. “सतत वर्षे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? हा प्रश्न विचारला जात आहे. ज्या प्रकारची हुकूमशाही, दडपशाही सुरु आहे. पैशांचं राजकारण सुरु आहे. ही महाराष्ट्राची ओळख पुसायची असेल, तर या प्रवृत्ती विरुद्ध ज्यांची मनापासून आणि प्रामाणिकपणे लढण्याची इच्छा आहे. त्या सर्व घटकांनी एकत्र यावं, या मताचा मी आहे. अनेक दगडांवर पाय ठेवून आता कुणालाही महाराष्ट्राचं राजकारण करता येणार नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.