Border Issue: गृहमंत्री अमित शाह सीमावाद प्रश्नावरून काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गटाबाबत म्हणाले

Border Issue: सीमावाद तोडगा काढण्यासाठी अमित शाह यांनी सहा मंत्र्यांची समिती स्थापन केली

0

नवी दिल्ली,दि.15: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सीमावाद (Border Issue) प्रश्नावर काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Border Issue) चिघळला असताना असताना बुधवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यावेळी उपस्थित होते. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी अमित शाह यांनी सहा मंत्र्यांची समिती स्थापन केली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंतर दिली. 

काय म्हणाले अमित शाह? | Amit Shah On Border Issue

बैठकीनंतर अमित शाह म्हणाले की, गृहविभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चांगल्या वातावरणात ही चर्चा झाली. दोन्ही राज्यांच्या वतीने प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा मंत्र्यांमध्ये बैठक होईल. दोन्ही बाजूंकडील कायदा व सुव्यवस्थेची काळजी घेतली जावी. प्रवासी, व्यापारी यांना त्रास होऊ नये, यासाठी दोन्ही बाजूंनी आयपीएस अधिकारी नेमण्याची तयारी दाखविण्यात आली.

Border Issue

सीमावाद केंद्राने प्रथमच हस्तक्षेप केला: देवेंद्र फडणवीस

अमित शाह यांनी ही बैठक घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने दोन्ही राज्यांचे म्हणणे ऐकून घेतले. 

सीमावादात केंद्राने प्रथमच हस्तक्षेप केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि ट्वीटनंतर सीमा प्रश्न चिघळला होता. यावर बोम्मई यांनी असे स्पष्ट केले की, ते माझे वक्तव्य नव्हते. ते ट्विटर हँडल माझे नाही.

काय ठरले बैठकीत?

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत कोणतेही राज्य एकमेकांच्या भूभागावर दावा सांगणार नाही. 
दोन्ही बाजूंचे तीन-तीन याप्रमाणे सहा मंत्री या मुद्द्यावर चर्चा करतील. 
मोठ्या नेत्यांच्या नावे बनावट ट्विटर खाती तयार करून अफवा पसरविल्या गेल्या. अशा बनावट खात्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. 
लोकांचे हित पाहता यावरून राजकारण केले जाऊ नये. 

दोन्ही बाजूंनी बैठकीत सकारात्मक भूमिका मांडण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या प्रकरणात सहकार्य करील, अशी अपेक्षा आहे. 

  • अमित शहा, गृहमंत्री 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here