अमर पाटील यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड

0

सोलापूर,दि.१८: हत्तूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य अमर रतिकांत पाटील यांची सोलापूर जिल्हा नियोजन समिती मंडळावर निवड झाली आहे. अमर पाटील हे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आहेत.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख असलेले अमर पाटील हे विविध पदे भूषवित असून यामध्ये सोलापूर बाजार समितीचे संचालक तसेच श्री सिद्धेश्वर सहकारी साखर यांचे संचालक या पदाचा समावेश आहे त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याने या पदाच्या माध्यमातून मतदारसंघासाठी विकास निधी खेचून आणू अशी ग्वाही पाटील यांनी दिली आहे.

पक्षाचे आभार
शिवसेना पक्षाच्या माध्यमातून हे पद मिळाले आहे.या पदाचा उपयोग दक्षिण सोलापूर मतदारसंघाच्या विकासासाठी आपण करणार आहोत.पक्षश्रेष्ठीचे मनपूर्वक आभार
अमर पाटील
नूतन सदस्य जिल्हा नियोजन समिती


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here