Amalner Stone Pelting: महाराष्ट्रातील आणखी एका शहरात तणाव, दोन गटांत तुफान दगडफेक; संचारबंदी लागू

0

जळगाव,दि.१०: Amalner Stone Pelting: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तणावाची स्थिती असतानाच आता जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात दगडी गेट परिसरात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. दोन ते तीन तरुणांमध्ये किरकोळ कारणातून झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले आणि या वादाचे पडसाद उमटत दोन गटांमध्ये दगडफेक झाली. यामध्ये काही वाहनांचं नुकसान झालं असून तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह तीन ते चार नागरिकही जखमी झाले आहे. या घटनेनंतर सदर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळत आहे. (Amalner Stone Pelting News)

Amalner Stone Pelting | संचारबंदी लागू

पोलिसांनी वेळीच धाव घेत शांतता प्रस्थापित केली असून खबरदारीचा उपाय म्हणून शहरात शनिवार ते सोमवार या काळात संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये व शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अमळनेर शहरातील जीनगर गल्ली, जुना पारधीवाडा आणि सराफ बाजार परिसरात रात्री अल्पवयीन मुलांच्या किरकोळ भांडणातून सामाजिक तेढ निर्माण होऊन दगडफेक झाली. त्यामुळे शहरात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. दोन गट परस्परांना भिडले. दुकानाची तोडफोड झाली. अनेक घरांवर दगडफेक झाली आहे. या घटनेमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. शहराची कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्री उशिरा जळगावहून जादा कुमक मागवण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, सहाय्यक निरीक्षक राकेशसिंग परदेशी व पोलीस कर्मचार्‍यांनी धाव घेत उपद्रवींचा शोध सुरू केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात दगडी गेट परिसरात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.

View this post on Instagram

A post shared by SolapurVarta (@solapur_varta)

दगडफेक करणारे दोन्ही गटातील ३२ तरुण ताब्यात | Amalner Stone Pelting News

पोलिसांनी घटनेची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर अतिरिक्त कुमक जळगावहून मागवली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी ही भेट देत अधिकार्‍यांना सूचना करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आदेश केले. आणि संशयितांवर कारवाईच्या सूचना केल्या. यावेळी एलसीबीचे पथकही दाखल झाले होते. या घटनेत पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या ३२ तरुणांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई सुरू केली असून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

१२ जूनपर्यंत संचारबंदी लागू; प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

अमळनेर शहरात रात्री दोन गटात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकाऱ्यांनी कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू केली आहे. आज दिनांक १० रोजी सकाळी ११ वाजेपासून ते दि. १२ जून रोजीच्या सकाळी ११ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व जनजीवन सुरळीत राहावे या करीता प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी फौजदारी प्रकोया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here