Satyajeet Tambe | महेश इंगळेंचे जीवन भक्ती, सेवा, सहकाराने परिपूर्ण: सत्यजीत तांबे

0

सोलापूर,दि.8: Satyajeet Tambe On Mahesh Ingale: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानने अलीकडील काळात धार्मिक, आध्यात्मिक, व भाविकांना स्वामी दर्शन सेवाकार्यात भरीव योगदान देत मोठ्या स्वामी सेवेचे व्रत जोपासले आहे. या कार्यास मंदिर समितीचे प्रमुख महेश इंगळे (Mahesh Ingale) यांचे भरीव योगदान लाभले असल्याने हे सर्व शक्य होत आहे. त्यामुळे महेश इंगळेंचे जीवन भक्ती, सेवा व सहकाराने परिपूर्ण असल्याचे प्रतिपादन संगमनेर येथील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी केले.

सत्यजीत तांबे यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन | Satyajeet Tambe

सत्यजीत तांबे यांनी नुकतेच अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे (Shri Swami Samarth) दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी सत्यजीत तांबे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी तांबे बोलत होते.

हेही वाचा Earthquake: महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील गावांना भूकंपाचा धक्का

Satyajeet Tambe On Mahesh Ingale
महेश इंगळे

महेश इंगळेंचे जीवन भक्ती, सेवा,सहकाराने परिपूर्ण | Satyajeet Tambe On Mahesh Ingale

पुढे बोलताना तांबे यांनी स्वामी समर्थांची महिमा अगाध आहे. स्वामी भक्तीचे प्रत्यय भाविकांना आल्याने स्वामी भक्तांची संख्या असंख्य आहे. या असंख्य स्वामी भक्तांच्या माध्यमातून येथील वटवृक्ष मंदिरास रोज विविध स्वामी भक्त भेटी देत असतात. सर्वांना उत्कृष्ट स्वामी दर्शनाचे नियोजन भक्ती, सेवाभाव व सहकार हे सुत्र अंगिकारून महेश इंगळे यांनी आपले जीवन भक्ती सेवा व सहकाराकरिता अर्पण केल्याने आता भक्ती, सेवा व सहकारातून त्यांचे जीवन परिपूर्ण असल्याचे मनोगत ही तांबे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी शिवराज स्वामी, सरफराज शेख, शबाब शेख, बाबासाहेब पाटील, शाकीर पटेल, रुद्रय्या स्वामी, शहर काँग्रेस अध्यक्ष बसवराज अळ्ळोळी, विनोद राठोड, मुबारक कोरबू, नितीन शिवशरण, कल्लप्पा हळदे, श्रीशैल गवंडी, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, श्रीकांत मलवे, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ, अविनाश क्षीरसागर, आदिसह स्वामीभक्त उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here