सोलापूर,दि.२१: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट नगरपरिषदेचा निकालाआधीच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे. अक्कलकोटमध्ये मिलन कल्याणशेट्टी यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत. कार्यकर्त्यांनी मिलन कल्याणशेट्टी प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याचे सोशल मिडीयावर जाहीर केले आहे. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी आहेत.
महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होणार आहेत. अनेक ठिकाणी भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. अनेक नगरपंचायतींचे निकालाचे कल हाती येत आहेत. सध्या भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. अक्कलकोटमध्ये भाजपाला आपल्या विजयाचा फारच आत्मविश्वास दिसत आहे.
मिलन कल्याणशेट्टी हे भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू आहेत. मिलन कल्याणशेट्टी यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे अशपाक बळोरगी, शिवसेना शिंदे गटातर्फे रईस टिनवाला हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत.








