दि.२८: Ajit Pawar On Sujay Vikhe Patil: भाजपा खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाचे (BJP) खासदार सुजय विखे पाटील (sujay vikhe patil) यांनी “राष्ट्रवादी काँग्रेस नवरा, शिवसेना बायको तर काँग्रेस ही जेवणापुरती आलेले वऱ्हाडी” असे म्हणत महाविकास आघाडी सरकारचं (Maha Vikas Aghadi) वर्णन केले होते. नवऱ्यानं दुसरी सवत आणू नये म्हणून शिवसेना मूकपणे अन्याय सहन करीत आहे, तर कितीही तिरस्कार केला तरी जेवणासाठी वऱ्हाडी म्हणून आलेली काँग्रेस हटायला तयार नाही’, अशा शब्दांत भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( sujay vikhe patil ) यांनी महाविकास आघाडी सरकारचं वर्णन केलं होत.
आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुजय विखेंना प्रत्तुत्तर दिले आहे. “ज्यांना उद्योग नाहीत ते टिका टिप्पणी करतात. माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे की, असल्या गोष्टीला जास्त महत्त्व देण्यापेक्षा उलट तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे मी इथे येऊन पटापट निर्णय घेतले आहेत. त्याला महत्त्व द्यायला हवं. ज्यांना आता उद्योग नाहीत त्यांनी आमच्यावर टीका करायची आणि आम्ही त्यांना उत्तर द्यायचे. याच्यातून मी काय साधणार आणि राज्यातली जनता काय साधणार आहे याचाही विचार केला पाहिजे. ज्यांची वक्तव्ये गांभीर्याने घेण्याची गरज आहे अशांना आम्ही उत्तर देऊ. त्यांच्या वक्तव्याला फार काही महत्त्व देण्याचे कारण नाही,” असे अजित पवार म्हणाले.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्यावरूनही सुजय विखेंनी भाष्य केले. “आम्ही तर त्यांना चोऱ्या करायला लावल्या नव्हत्या. त्यांनी चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले..देशात सत्तेचा वापर कुणी जास्त केला आहे, हे आणीबाणीच्या काळात देशाच्या जनतेनं पाहिलं आहे. कश्मीर पंडितांवर झालेला अत्याचार देखील जनतेसमोर आला आहे. ज्या लोकांनी पैसे खाऊन कारखाने बांधले, संस्था केल्या हा गरीब जनतेचा पैसा नव्हता का?” असा सवाल सुजय विखे पाटील यांनी केला आहे