पुणे,दि.11: Ajit Pawar News: समृद्धी महामार्गबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar News) प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तब्बल 55 हजार कोटी रुपये खर्च करून 701 किलोमीटर लांबीचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग साकार होत आहे. हा मार्ग तब्बल 10 जिल्हे व 26 तालुक्यांना जोडणार असून, हा मार्ग महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार आहे.
समृद्धी महामार्ग: काय म्हणाले अजित पवार?
‘समृद्धी महामार्ग काही माझा नाही. पण मला उद्घाटनाचं आमंत्रण आलं आहे. या रस्त्यामुळे अनेक गाव जोडणार आहे. वेळ कमी होणार आहे. आमच्या सरकार काळातही समृद्धी महामार्गाला मदत दिली. आम्ही उद्घाटन करणार होतो पण एका पुलाचं काम राहील त्यामुळे नाही करता आलं, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खंत बोलून दाखवली.
अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी समृद्धी महामार्ग उद्घाटनावर आपली प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा स्पीड पाहिला का: अजित पवार
समृद्धी महामार्ग वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. उपमुख्यमंत्र्यांनी गाडी चालवली, ती गाडी कोणाची होती? मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा स्पीड पाहिला का, एका महामार्गावर एक स्पीड दुसऱ्या महामार्गावर वेगळा स्पीड असं कोण ठरवतं माहिती नाही. या स्पीड वरून कोणी कोर्टात जाऊ नये म्हणजे झालं, असा टोलाही अजितदादांनी फडणवीसांना लगावला.
समृद्धी महामार्ग माझं नाही: अजित पवार
‘समृद्धी महामार्ग माझं नाही. पण मला आमंत्रण आलं आहे. या रस्त्यामुळे अनेक गाव जोडणार आहे. वेळ कमी होणार आहे. पुढचा टप्पा लवकर होण्या करता काम सुरू आहे. आमच्या सरकार काळातही समृद्धी महामार्गाला मदत दिली. आम्ही उद्घाटन करणार होतो पण एका ब्रिजचं काम राहील त्यामुळे नाही करता आलं. या मार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं आहे. काही अडचणी आहेत पण होईल सगळं काम, मोठा रस्ता होतोय, असं अजित पवार म्हणाले.
कुठल्या व्यक्तीवर अशी शाईफेक करू नये: अजित पवार
कोणी मोठी व्यक्ती असली की त्याला एक्स वाय सुरक्षा दिली जाते. कुठल्या व्यक्तीवर अशी शाईफेक करू नये, वैचारिक मतभेद असतील. पण कायदा हातात कोणी घेऊ नये. आपण बोलताना कोणाला त्रास होणार नाही. शाल जोडीतील शद्ब वापरता येतात पण कालची गोष्ट चुकीचीच होती. आपण बोलताना महापुरुष बोलून टाळलं पाहिजे, बोलताना तारतम्य बाळगला पाहिजे, असा सल्लाही अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना दिला.