Ajit Pawar On Naresh Mhaske: आलतू फालतू स्टेटमेंट करणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही: अजित पवार

0

मुंबई,दि.31: Ajit Pawar On Naresh Mhaske: आलतू फालतू स्टेटमेंट करणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही असे म्हणत अजित पवार यांनी शिंदे गटाच्या नेत्याने केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे नेते ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी ताकद पणाला लावली होती, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. रोहित पवार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती.

त्यांच्याविरोधात अभिषेक बोके हे निवडणुकीच्या मैदानात होते. परंतु, रोहित पवार यांनी क्लब वर्गातून सर्वाधिक मतं मिळवत विजय मिळवला होता. निवडणुकीच्या काळात पवार कुटुंबातील एक व्यक्ती रोहित पवारांना पाडा, म्हणून सर्वांना फोन करत होती असा दावा त्यांनी केला.

काय म्हणाले अजित पवार? | Ajit Pawar On Naresh Mhaske

अजित पवार यांनी नरेश म्हस्के यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. कोण नरेश म्हस्के? मी त्यांना ओळखत नाही, त्यामुळे आलतू फालतू स्टेटमेंट करणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही. आम्ही घरामध्ये असं कधीच वागत नाही. अजित पवार जे इकडे बोलतो तीच मागेही भूमिका असते, हे महाराष्ट्राला माहिती आहे. माझ्याकडून असं कधीच घडणार नाही, तो आमच्या घरातला आहे. तो माझा पुतण्या आहे, माझ्या मुलासारखा तो आहे, असं अजित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले… | Rohit Pawar On Naresh Mhaske

नरेश म्हस्के यांच्या आरोपांवर रोहित पवारांनी पलटवार केला आहे. नरेश म्हस्के यांना ओळखत नाही, त्यांना भेटलो नाही पण त्यांच्याबद्दल ऐकलं आहे. ते नगराध्यक्ष कसे झाले, ते इतर पक्षात जाणार होते. राजकीय उंची पाहून बोलावं. उद्धव ठाकरेंनी त्यांना नगराध्यक्ष बनवलं. ते काँग्रेसमध्ये जाणार होते. ते अजितदादा आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर बोलले. राजकीय उंची बघून बोलावं, असा टोला रोहित पवारांनी लगावला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here