‘अजित पवार हा अत्यंत अहंकारी माणूस’ विजय शिवतारे

0

मुंबई,दि.18: शिवसेना (शिंदे गट) नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बारामती लोकसभा निवडणूक अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढवण्याची शक्यता आहे. शिवतारे यांचा अजित पवारांना विरोध आहे. शिवतारे यांनी बारामती मतदारसंघावर दावा केला आहे. त्यांना या जागेवरून निवडणूक लढवायची आहे.

बारामतीच्या जागेवरून शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. कोणत्याही परिस्थितीत बारामतीतून लढणारच असा निर्धार शिवतारे यांनी व्यक्त केला आहे. शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुसऱ्यांदा भेट घेतली, यानंतरही शिवतारे भूमिकेवर ठाम आहेत.

अजितदादा नालायक आणि उर्मट आहे, असं मी म्हणालो होतो. तेच त्यांचे बंधूही म्हणाले आहेत. इतकं सगळं होऊनही अजितदादांनी मला साधा फोनही केला नाही. इतका अहंकार आहे. ही अहंकाराची लढाई नाही, असं सांगतानाच माझी जनता जे सांगेल तेच मी करेन असे शिवतारे म्हणाले.

शिवतारे म्हणाले, “”माझ्या विरोधात कोणीही असले तरी जनतेच्या पाठिंब्याने मला ही लढाई जिंकायची आहे. राष्ट्रवादी आणि भाजप हे मित्रपक्ष आहेत. ही जागा (बारामती) त्यांच्याकडे गेली आहे, मग ती मला कशी मिळणार? 2019 मध्ये अजित पवार म्हणाले होते की ‘तुझी लायकी किती? तू बोलतो किती? तुझा आवाका किती?’

माझा अवाका नाही तर कशाला धडपड करतो? आमच्या मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेलिंग करतो, इकडे उमेदवार उभे करू, तिकडे उभे करू? असा इशारा देतो. कशाला करतो? लढ ना तुझ्या ताकदीवर, असं आव्हान देतानाच माझा पाठिंबा जनतेला आहे. जनता सांगेल ते करणार. महायुतीचा धर्म निभवायचा की नाही याबाबत मी दोन-चार दिवसात माझी भूमिका व्यक्त करणार आहे, असं विजय शिवतारे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here