नागपूर,दि.27: Ajit Pawar Speech In Assembly: जर अजित पवार यांनी ठरवल ना तर कोणाच्या बापाला घाबरत नाही असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपाला इशारा दिला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात बोलताना पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला. सध्या नागपूरच्या कडाक्याच्या थंडीत हिवाळी अधिवेशन चांगलच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून ऐकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात बोलताना भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना टोला लगावला. (Ajit Pawar Warn Chandrashekhar Bawankule) काही दिवसांपूर्वी बारामती येथे येऊन हा लोकसभा मतदारसंघ जिंकणार म्हणजे जिंकणारच असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला होता. या वक्तव्याचा आता अजित पवारांनी समाचार घेतला आहे.
जर अजित पवार यांनी ठरवल ना तर कोणाच्या बापाला घाबरत नाही… | Ajit Pawar Speech In Assembly
काही महिन्यांपूर्वी बारामती येथे येऊन भाजप आणि शिंदे गट एकत्र लढणार असून बारामती लोकसभा मतदारसंघात तगडी लढत देऊ असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. या वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत याला उत्तर दिलं आहे. “चंद्रशेखर बावनकुळे बारामतीमध्ये येऊन मला चॅलेंज देतात. घड्याळाचा करेक्ट कार्यक्रम करणार, पण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती जर अजित पवार यांनी ठरवल ना तर कोणाच्या बापाला घाबरत नाही, त्यामुळे मी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेन”, असा इशाराच अजित पवार यांनी बानकुळे यांना दिला आहे.

मी करेक्ट कार्यक्रम करेन | Ajit Pawar News Today
तर महाविकास आघाडी सरकारने विकास केलाच नाही, असं सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेकट कार्यक्रम करण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. पण मनात ठरविले तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेन. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. थोडा दमाने घ्या, असाही टोला पवारांनी लगावला आहे.
मंत्रिमंडळात एकही महिला नाही : पवार
सहा महिने मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. मात्र, मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री देण्यात आलेला नाही. मी देवेंद्रजी घरी येऊन वहिनीला सांगतो, म्हणजे ते तुम्हाला सांगतील आणि तुम्ही मनावर घ्याल. ज्यामुळे लवकरच महाराष्ट्रात महिला मंत्री होईल. तुम्ही आजच रात्री दिल्लीला फोन लावा आणि उद्याच्या उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार करा, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
चंद्रकांत पाटलांचा तळतळाट लागेल: पवार
देवेंद्र फडणवीस तुम्ही स्वतःकडे सात सात महत्त्वाची खाती ठेवली आणि चंद्रकांत पाटलांना साधी दोन खाते दिली. आमचा कोल्हापूरचा ढाण्या वाघ आहे. तुम्हाला चंद्रकांत पाटलांचा तळतळाट लागेल, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी करताच सभागृहात हशा पिकला.