सोलापूर,दि.10 : सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) ओमिक्रॉनने (Omicron) शिरकाव केल्यानंतर सतर्कता बाळगली जात आहे. नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर (Vaccination) भर दिला जात आहे. ओमिक्रॉन धोक्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनानेही (Solapur District Administration) मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरणाचे (Vaccination) दोन्ही डोस घेतले नसतील तर संबंधीतांचे रेशन दुकानातील धान्य बंद करण्याबरोबरच महापालिका, सेतू, मॉल व सरकारी कार्यालयात प्रवेशबंदी केली जाईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी सकाळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी पोलीस प्रशासन, महापालिका, आरोग्य विभाग, जिल्हा पुरवठा विभाग यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना दिल्या. यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, महापालिका उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ बसवराज लोहार उपस्थित होते.
हेही वाचा Omicron Variant चा महाराष्ट्रात शिरकाव झाल्यानंतर ‘R’ वैल्यूने वाढवली महाराष्ट्राची चिंता
कोरोना संसर्गाच्या (Corona Infection) दोन लाटानंतर आता तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave) शक्यता वर्तवली जात आहे. ओमीक्रॉन नावाच्या नव्या कोरोना व्हेरियंटची सध्या भीती आहे. असे असताना सोलापूरच्या ग्रामीण भागात 6 लाख तर शहरी भागातील 2 लाख नागरिकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही. ओमीक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले असून लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने लसीकरण मोहीम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा e-PAN Card असं करा डाउनलोड, फिजिकल कॉपी जवळ बाळगण्याची गरज नाही
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देताना लसीकरणाची आकडेवारी सांगून त्यांनी प्रथम नाराजी व्यक्त केली. महापालिका प्रवेशद्वार, रेशन दुकाने, सेतू कार्यालय, झोन कार्यालय, बिग बझार, डी मार्ट अशा ठिकाणी लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश द्या, पोलीस संरक्षण घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.