मुंबई,दि.17: लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार हे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना महिन्याला 1500 रूपये मिळतात.
राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
तटकरे म्हणाल्या की, राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तंतरणाद्वरे (डी बी टी द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी 3 हजार 690 कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे.