नवी दिल्ली,दि.12: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) भर रस्त्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. चंदेरी दुनियेतील कलाकार चर्चेत राहण्यासाठी नेहमीच कोणता ना कोणता पर्याय शोधून काढतात. इतकंच नव्हे तर आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तर नवनवीन कल्पना सुचवतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील यापैकीच एक आहे. सध्या ती तिच्या आगामी ‘निकम्मा’ (Nikamma) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यानचा तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
‘निकम्मा’च्या प्रमोशनसाठी शिल्पा दिल्लीला गेली होती. दिल्लीमध्ये शिल्पाने चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. या प्रमोशनदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा ‘निकम्मा’ चित्रपटातील गाण्यावर चक्क थिएटरच्या छतावर चढून डान्स करत आहे. तसेच तिच्याबरोबर या चित्रपटामधील कलाकार अभिमन्यु दसानी, शर्ली सेतिया देखील डान्स करताना दिसत आहेत.
तसेच शिल्पाने भररस्त्यात देखील चित्रपटाच्या टीमबरोबर मनसोक्त डान्स केला. यावेळी तिला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. काही तासांमध्येच शिल्पाच्या या व्हिडीओला भरभरुन पसंती मिळाली आहे. पण काही जणांनी नकारात्मक कमेंट देखील केल्या आहेत. एका युजरने कितीही प्रयत्न केला तरी चित्रपट फ्लॉप होणार असं म्हटलं आहे.