अक्कलकोट,दि.25: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे स्वामी दर्शनासाठी मंदीरात येणाऱ्या भाविकांकरीता असलेल्या सोई सुविधा या सर्वोत्तम दर्जाच्या असून यासह मंदिर समितीचे सर्व धार्मिक सामाजिक उपक्रम उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन
सोलापूर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले.
उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी नुकतीच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्नीक भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला.
यावेळी मंदीर समितीच्या विविध कार्याचा आढावा घेतल्यानंतर बोलताना शमा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मंदीर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, अक्कलकोटचे तहसिलदार बाळासाहेब सिरसट, तलाठी पंचप्पा म्हेत्रे, गोपी माने, सुनील नंदीकोले, श्रीशैल गवंडी, संजय पवार, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, विपूल जाधव, प्रसाद सोनार इत्यादी उपस्थित होते.