सोलापूर,दि.8: महिलेचा विनयभंग प्रकरणात न्यायालयाने आरोपीची जामीनावर मुक्तता केली आहे. यातील फिर्यादी यांचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी बजरंग शिवाजी गायकवाड याचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. आर. भोला यांनी जामीनावर मुक्तता केलेली आहे. यात हकीकत अशी की मागील पाच ते सहा महिन्यापासून बजरंग हा दारू पिऊन फिर्यादी यांच्या घरासमोरून जाताना फिर्यादी यांना वाईट नजरेने एकटक पाहत होता.
महिलेचा विनयभंग प्रकरणात जामीन
परंतु सदर बाब फिर्यादी यांनी कोणासही सांगितली नव्हती, त्यानंतर फिर्यादी यांच्या गल्लीतील ओळखीच्या इतर महिलांवर सुद्धा आरोपीने अश्लील व लज्जा वाटेल असे कृत्य केल्याने फिर्यादी यांनी वरील आरोपी बजरंग शिवाजी गायकवाड याच्यावर जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 354, 354 (D) 452, 509 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी आरोपींला अटक करून कोर्टात हजर केले असता कोर्टाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवले.
त्यामुळे यातील आरोपींच्या वकिलांनी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात जमिनीचा अर्ज दाखल केलेला होता. युक्तीवादामध्ये आरोपीच्या वकिलांनी भादवे कलम 354 व 452 हे सदर गुन्ह्यात लागू होत नाही तसेच केवळ आणि केवळ राजकीय कारणातून आरोपींना खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलेले आहे, असे युक्तिवादामध्ये सांगितले. तेव्हा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टाने आरोपींची जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश केला.
या खटल्यात आरोपीतर्फे ॲड. राजकुमार बाबरे, सरकार पक्षातर्फे ॲड बनसोडे तर मूळ फिर्यादीतर्फे ॲड. विनीत कुमार गायकवाड यांनी काम पाहिले.