सोलापूर,दि.२: फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी न्यायालयाने एकास अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यात हकिकत अशी की, संशयीत आरोपी शिवशंकर इंग्रज गायकवाड, रा. देगाव रोड, सोलापूर याच्यासह अन्य एका विरुध्द सलगर वस्ती पोलीस स्टेशन मध्ये फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली होती.
सदर संशयीत आरोपीने अटक होण्याच्या भितीपोटी ॲड. अभिजीत इटकर यांच्या मार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला. युक्तीवाद करते वेळी आरोपीच्या वकिलांनी असा युक्तीवाद केला की, सदर आरोपीचा कुठलाही सक्रीय सहभाग सदर गुन्हयामध्ये दिसून येत नाही. तसेव सदर आरोपीकडून काही एक जप्त करावयाचे नाही. त्यामुळे सदर आरोपीस पोलीसांच्या ताब्यात देऊन कुठलाही फायदा होणार नाही.
सदर युक्तीवाद ग्राहय धरुन सत्र न्यायाधिश, सोलापूर यांनी सदर आरोपीस अटकपुर्व जामीन मंजूर केला. सदरकामी यात आरोपी तर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. दत्ता गुंड, ॲड. निशांत लोंढे तर सरकार पक्षा तर्फे ॲड. प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले.