सोलापूर,दि.5: विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. साईराम बिरु राहणार जोडभावी पेठ सोलापूर यांचेवर जेलरोड पोलीस स्टेशन येथे विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता. त्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली व जामिनावर सोडण्यात आले होते.
त्यानंतर सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपीविरुद्ध भा.द.वि. कलम 354 (अ)(क)(द),504,506 अन्वये मुख्य न्यायदंडाधिकारी सोलापूर यांचेकडे चार्जशीट दाखल करण्यात आली आणि सदर प्रकरणाची चौकशी होऊन आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळाला नसल्याने यातील आरोपीस न्यायदंडाधिकारी किरमे यांनी निर्दोष मुक्त केले.
यातील आरोपी तर्फे ॲड. सौरभ साळुंके व ॲड. फिरोज शेख तर सरकार तर्फे ॲड. काळे यांनी काम पाहिले








