कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात,मदत करण्याऐवजी कोंबड्या पळवण्यासाठी गर्दी

0

सोलापूर,दि.24: अपघात झाल्यानंतर मदतीला धावून येणारे सोलापूरकर आज मात्र कोंबड्या पळविण्यात मग्न असल्याचे दिसून आले. सोलापूरमध्ये (Solapur) कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात (Tragic Accident) झाला आहे. धक्कादायक म्हणजे अपघातानंतर स्थानिक नागरिकांची कोंबड्या पळवण्यासाठी एक धावपळ उडाली. टेम्पोमधल्या कोंबड्या घेऊन जाण्यासाठी स्थानिकांची झुंबड अपघातास्थळी दिसली. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

अपघात झालेल्या टेम्पोतील सर्व कोंबड्या पळवून नेल्या आहेत. सोलापूर पुणे महामार्गावर कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात झाला. पुण्याहून सोलापूर शहराकडे टेम्पो येत होता. सोलापूर शहरानजीक बाळे पुलाजवळ हा अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर मदत करण्याऐवजी परिसरातील नागरिकांनी कोंबड्या पळवण्यासाठी गर्दी केली.

View this post on Instagram

A post shared by SolapurVarta (@solapur_varta)

रविवारी पहाटेच्या सोलापूर पुणे महामार्गावरील बाळे येथे सुमारास टेम्पोचा अपघात झाला. पुण्यावरुन सोलापूरकडे हा आयशर टेम्पो येत होता. या टेम्पोमधून कोंबड्यांची वाहतूक केली जात होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here