Accident: शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गाडीचा अपघात

0

उस्मानाबाद,दि.६: Accident: उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. एका लग्न सोहळ्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी चव्हाणवाडी गावाच्या हद्दीजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटर सायकलने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गाडीला जोराची धडक दिली. सुदैवाने अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसंच या अपघातामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर त्यांचे स्वीय सहाय्यक, चालक, तसंच पोलीस सुरक्षा रक्षक व शिवसैनिक सुखरूप बचावले.

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर हे दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास बारुळ मंगरूळ चव्हाणवाडीकडून देवकुरुळी मार्गे माळुंब्रा येथे जात असताना अचानक समोरून येणारी मोटर सायकल खासदारांच्या गाडीवर आदळली. खा. निंबाळकर यांच्या चालकाने गाडी जागेवर थांबवली. त्यामुळे पुढील होणारा अनर्थ टाळला. मोटर सायकलस्वार जखमी झालाय.

मोटरसायकल चालकाला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतःच्या गाडीमध्ये जखमीला तुळजापूर येथील सिटी स्कॅन सेंटर येथे उपचारासाठी घेऊन आले. मोटरसायकलस्वार जखमी झाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here