ACB ने सहाय्यक अभियंता सुनिल लामकाने यांना १३ हजारांची लाच घेताना पकडले

सुनिल लामकाने हे सोलापूर महानगरपालिकेत गवसु विभागात सहाय्यक अभियंता आहेत

0

सोलापूर,दि.१७: सोलापूर महानगरपालिकेतील सहाय्यक अभियंता सुनिल लामकाने यांना ACB ने १३ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. ठेकेदाराकडून १३ हजार रुपयांची लाच घेताना महापालिकेतील गलिच्छ वस्ती सुधारणा तांत्रिक विभागाकडील सहाय्यक अभियंता सुनील नेमिनाथ लामकाने (वय ५७, रा. दमाणी नगर) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) त्यांच्याच कार्यालयात रंगेहात पकडले. लामकाने यांना ठेकेदाराने अडकवल्याची चर्चा संपूर्ण पालिका वर्तुळात सुरू होती.

काय आहे प्रकरण?

तक्रारदार हे ठेकेदार आहे. त्याच्याकडे सुनील लामकाने यांनी सोलापूर हद्दीत शेळगी ते स्मशानभूमी येथे केलेल्या डांबरी रस्ता रस्त्याचे मोजमाप पुस्तकावर सही करून दिल्याचा मोबदला म्हणून ६ हजार रुपये तसेच बारामती बँक ते आकाशगंगा मंदिर येथील डांबरी रस्त्याचे मोजमाप पुस्तकावर सही करण्याकरिता ७ हजार रुपये असे एकूण १३ हजारांची मागणी केली होती.

सुनिल लामकाने
सुनिल लामकाने

ठेकेदारने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधाला

त्यानंतर संबंधित ठेकेदारने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधाला. लाचेची रक्कम महापालिकेच्या गवसु तांत्रिक विभागातील कक्षामध्ये लामकाने हा स्वीकारत असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पर्यवेक्षण अधिकारी गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार गिरीश कुमार सोनवणे, पोलीस नाईक अतुल घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल सन्नाके, सलीम मुल्ला यांच्या पथकाने केली.

या घटनेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लामकाने याच्या दमाणीनगर येथील प्रियदर्शनी अपार्टमेंटमधील राहत्या निवासस्थानी भेट देऊन घराची झाडाझडती करून चौकशी सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. लामकाने यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here