Abhishek Singhvi On Maharashtra Crisis | पक्षानं तिकीट दिलं, म्हणून हे आमदार निवडून आले: अभिषेक मनू सिंघवी

0

नवी दिल्ली,दि.१६: Abhishek Singhvi On Maharashtra Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाच्यावतीने ॲड. कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने ॲड. अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Singhvi) हे युक्तिवाद करत आहेत.

देशात पक्षाधारित लोकशाही आहे. दहाव्या परिशिष्टाचा आधारच राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवा असा आहे. व्हीपचं उल्लंघन करणं म्हणजे पक्षाचं सदस्यत्व स्वत:हून सोडणं असाच अर्थ होतो असा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी केला.

तुमच्या पक्षाचा तुम्ही इतका तिरस्कार करत असाल, तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊन सांगा की तुम्हीच मूळ पक्ष आहात. तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नका. पण त्यांनी १०व्या परिशिष्टाकडेच दुर्लक्ष केलं, असे सिंघवी यांनी म्हटले आहे.

तुम्ही राजीनामा दिला नाही, तुम्ही दुसऱ्या पक्षात विलीनही झाला नाहीत. तुम्ही त्यांच्या मांडीवर बसला आहात. ते तुम्हाला पाठिंबा देत आहात. तुम्ही मुख्यमंत्री झालात. मग पक्षात विलीन व्हायला काय अडचण होती? असा सवाल सिंघवी यांनी उपस्थित केला.

सुरत आणि गुवाहाटीऐवजी तुम्ही निवडणूक आयोगाकडे का गेला नाहीत? तुम्ही राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक का लढवली नाही? तुम्ही भाजपात विलीन का झाला नाहीत? सिंघवींचे शिंदे गटाला सवाल.

अपात्रतेची भीती असल्यामुळेच ते २१ जूनला निवडणूक आयोगाकडे न जाता गुवाहाटीला गेले.

जर शिंदे गटाचे आमदार भाजपात विलीन झाले असते, तर त्यांची शिवसेना म्हणून असलेली ओळख संपली असती. त्यामुळे त्यांच्यासाठी दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा पर्यायच नव्हता. त्यांचं म्हणणं होतं की आमचा पक्षाध्यक्षांवर विश्वास राहिलेला नाही, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले.

प्रत्येक पक्षामध्ये मतभेद असतात. पण त्यावर तोडगा काढण्यासाठी पुरेशी प्रणाली उपलब्ध आहे. जर तोडगा निघाला नाही तर तुम्ही राजीनामा द्या. पण तुम्ही असं कसं म्हणू शकता की फक्त मतभेद आहेत म्हणून तुम्ही सरकार पाडाल? असा सवाल सिंघवी यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here