Aadhaar-Pan Linking : आधार-पॅन लिंक नाही केले तर होणार इतका दंड!

0

नवी दिल्ली,दि.28: Aadhar-Pan Linking: पॅन कार्डसोबत आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली संपत आली आहे. जर तुम्ही पॅन कार्डसोबत आधार कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला मोठा भुर्दंड सहन करावा लागू शकतो. पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत आता 30 जून 2023 रोजी संपत आहे.

पूर्वी ही मुदत 31 मार्च 2023 रोजीपर्यंत होती. सध्या तुम्ही 1000 रुपये दंड देऊन आधार-पॅनकार्ड लिंक करु शकता. पण 30 जूनपर्यंत हे दोन्ही कार्ड जोडले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. आता पाच वेळा संधी देऊनही आधार कार्ड-पॅन कार्डची जोडणी करण्यात आळस केला तर तुम्हाला जबरी दंड (Heavy Fine) सहन करावा लागेल.

पॅन कार्डशिवाय तुम्हाला पुढील अनेक व्यवहार करता येणार नाही. तेव्हा जोडणीची प्रक्रिया लवकर पूर्ण करा. दहा पटीत दंड भरण्यापेक्षा सध्या 1000 रुपये दंड जमा करणे आवश्यक आहे.

होणार इतका दंड | Aadhaar-Pan Linking

30 जूनपर्यंत दोन्ही कार्डची जोडणी न झाल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल. त्यानंतर जोडणी केल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड बसू शकतो. आयकर अधिनियमाच्या कलम 272बी अंतर्गत 10,000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता एक हजार रुपयांचा दंड भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यामुळे ज्यांना हे दोन्ही कार्ड जोडायचे आहे, त्यांना सध्याची रक्कम भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.

नियमानुसार जोडणी आवश्यक

आयकर अधिनियमचे कलम 139 एए नुसार, प्रत्येक वापरकर्त्याला, ज्याने 1 जुलै, 2017 रोजी पर्यंत पॅनकार्ड जारी करण्यात आले आहे आणि त्यांच्याकडे आधार कार्ड आहे. त्यांनी आधार कार्ड-पॅन कार्ड लिकिंग करणे आवश्यक आहे. या नियमातून आसाम, जम्मू आणि काश्मीर, मेघालय या राज्यातील रहिवाशांना ही प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज नाही. तसेच जे नागरीक 80 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यांनाही या प्रक्रियेतून सूट देण्यात आली आहे. तसेच जे भारतीय नागरीक नाहीत, त्यांना ही हे दोन्ही कार्ड लिंक करण्याची गरज नाही.

डेडलाईनपर्यंत आधार-पॅनकार्ड लिकिंग नाही केले तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. पॅनकार्ड निष्क्रिय झाले तर त्या नागरिकाला, करदात्याला आयकर रिटर्न फाईल करताना अडचणींचा सामना करावा लागेल. तर त्याचा टॅक्स रिफंडही अडकून पडेल. तर त्याच्या दुसऱ्या आर्थिक व्यवहारांवर पण परिणाम होईल. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर बँक खाते उघडण्यास अडचण होईल. तर म्युच्युअल फंड आणि स्टॉकमधील गुंतवणूक करणे अडचणीचे ठरेल.

असे करा पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक | Aadhaar-Pan Linking

  • सर्वात आधी आयकर विभागाच्या नवीन वेबसाइट https://www.incometax.gov.in वर जा. पेजवर तळाशी दिलेल्या आधार लिंक वर क्लिक करा.
  • तुमचे स्टेट्स पाहण्यासाठी  Click Here वर क्लिक करा. येथे तुम्हाला आधार आणि पॅनचे डिटेल्स द्यावे लागतील.
  • जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले असेल तर Your PAN is linked to Aadhaar Number असे दिसून येईल.
  • जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला http://www.incometax.gov.in वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर Link Aadhaar वर क्लिक करावे लागेल.

असा भरावा लागेल दंड!

स्टेप 1: पॅन-आधार लिंकिंगसाठी https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp Protean या पोर्टलला भेट द्या. 
स्टेप 2 : पॅन-आधार लिंकिंग रिक्वेस्टसाठी CHALLAN NO./ITNS 280 वर क्लिक करा.
स्टेप 3: Tax Applicable निवडा.
स्टेप 4 : मायनर हेड 500 (फी) आणि मेजर हेड 0021 (कंपन्यांव्यतिरिक्त इन्कम टॅक्स) अंतर्गत सिंगल चालानमध्ये फी भरणे सुनिश्चित करा.
स्टेप 5 : नेटबँकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंटची पद्धत निवडा.
स्टेप 6 : पॅन क्रमांक प्रविष्ट करा, असेसमेंट इयर निवडा आणि पत्ता प्रविष्ट करा.
स्टेप 7: कॅप्चा प्रविष्ट करा आणि  Proceed टॅबवर क्लिक करा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here