Aadhaar Card अपडेट केले नसेल तर आता ते…

0

मुंबई,दि.15: Aadhaar Card अपडेट केले नसेल तर आता ते 14 डिसेंबरपर्यंत मोफत अपडेट करता येणार आहे. आत्तापर्यंत आधार कार्ड अपडेट केले नसेल तर अजूनही ते मोफत अपडेट करता येणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आपली मोफत आधार अपडेट योजना 14 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. 

याचा फायदा लाखो आधार क्रमांक धारकांना होणार आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची पहिली तारीख 14 सप्टेंबर 2024 होती. मात्र, आता ही सेवा 14 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली असून, त्यानंतर ‘मायआधार’ पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आणि प्रोफाइलमध्ये बदल करण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे.

यूआयडीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. यूआयडीआय (UIDIA) लाखो आधार धारकांना यांचा लाभ घेता यावा म्हणून 14 डिसेंबर 2024 पर्यंत मोफत ऑनलाइन डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही सेवा निःशुल्क मायआधार पोर्टलवर उपलब्ध असणार आहे. UIDAI लोकांना यासाठी प्रोत्साहित केलं आहे. 

Aadhaar Card अपडेट करा

UIDAI लोकांना त्यांच्या आधारमध्ये सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. ज्यांनी त्यांचे आधार कार्ड एका दशकापेक्षा जास्त काळ अपडेट केलेले नाही त्यांनी ते आता करणे आवश्यक आहे. आधार क्रमांक वैयक्तिक बायोमेट्रिक्सशी जोडलेला आहे आणि भारतातील प्रत्येक नागरिकासाठी हे ओळखपत्र आहे. लोकांना 10 वर्षांतून एकदा तरी आधार कार्डमधील कागदपत्रे अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here