Aadhaar Card: UIDAI ने आधार कार्डसाठी नवीन निर्देश केले जारी

0

मुंबई,दि.26: Aadhaar Card: UIDAI ने आधार कार्डसाठी नवीन निर्देश जारी केले आहेत. आधार कार्ड अनेक ठिकाणी आवश्यक असते. बँकेत काढण्यापासून ते सिमकार्ड घेण्यासाठीही आधार लागते. आधार कार्ड सर्व नागरिकांना आवश्यक आहे. कोणत्याही सरकारी योजनेत लाभ घेण्यापासून ते बँक आणि मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. अशा वेळी, त्याची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. ज्यामुळे UIDAI वारंवार नियम बदलत आहे. आता आधार कार्ड जारी करणाऱ्या संस्थेने नवा आदेश जारी केला आहे.

आधार कार्डसाठी UIDAI चे निर्देश | Aadhaar Card

UIDAI च्या नवीन निर्देशांनुसार, आता कोणत्याही यूझर्सला आधार सर्टिफिकेशनपूर्वी ऑनलाइन किंवा ऑफलाइन परवानगी घेणे आवश्यक आहे. आधार धारकांना परवानगीशिवाय ते वापरता येणार नाही, कारण आदेशाशिवाय त्याचे व्हेरिफिकेशन होणार नाही. तुम्ही ही परवानगी ऑनलाइन किंवा ऑफलाइन घेऊ शकता.

UIDAI ने काय दिल्या सूचना

UIDAI ने रिक्वेस्ट करणार्‍या संस्थांना निर्देश दिले की, जो व्यक्ती आधार सर्टिफिकेशन ऑनलाइन करत आहे त्याने त्याची गरज जाणून घ्यावी. यूआयडीएआयने सांगितले की, यूझर्सला संपूर्ण कारण सांगून व्हेरिफिकेशनसाठी मंजुरी घ्यावी लागेल. तसेच ज्यावेळी व्हेरिफिकेशन केले जाईल तेव्हा संपूर्ण कागदपत्रे सोबत असावीत.

फसवणूक झाल्यास त्वरित…

आधार कार्डच्या संस्थेने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर यूझर्सला कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीशी संबंधित कोणतीही माहिती मिळाली तर त्याची माहिती त्वरित द्यावी. सोबतच त्याचा रिपोर्टही दाखल करावा. UIDAI ने म्हटले आहे की, जर कोणी आधार कार्डशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या अपडेटसाठी जास्त पैसे मागितले तर तुम्ही 1947 वर तक्रार करू शकता.

आधार कार्ड पॅनशी लिंक करा

आधार कार्डला पॅन कार्डसोबत अपडेट करण्याची अखेरची तारीख 31 मार्च आहे, जी 1000 रुपये दंडासह जमा केली जात आहे. जर तुम्ही अद्याप तुमचे आधार कार्ड पॅनशी लिंक केले नसेल, तर ते त्वरित करा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here