शासनाचे लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक: उपजिल्हाधिकारी शमा पवार

आधार कार्ड (Adhaar Card) अपडेट करण्याचे शमा पवार यांचे आवाहन

0

सोलापूर,दि. 5: शासनाचे लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अपडेट (Adhaar Card Update) करणे आवश्यक असल्याचे सोलापूरच्या उपजिल्हाधिकारी शमा पवार (Deputy Collector Shama Pawar) यांनी सांगितले आहे. अलिकडच्या काळात ओळखीचा पुरावा म्हणून आधारला महत्व प्राप्त झालेले आहे. नागरिकांना केंद्र तसेच राज्य शासनाचे लाभ घेण्याकरीता आधार कार्ड (Adhaar Card) अद्यावत असणे आवश्यक आहे. आधार कार्ड अद्यावत नसेल तर लाभ मिळणार नाहीत. तसेच ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढलेली आहेत. अशा आधार कार्ड धारकांनी प्रत्येक 10 वर्षांनी आधार कार्ड अपडेट करावे असे, आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आधार नोडल अधिकारी शमा पवार यांनी केले आहे.

आधार कार्डमध्ये माहिती अद्यावत करावी लागेल: शमा पवार

आधार योजना सुरु झाली तेव्हा आवश्यक कागदपत्रे ज्यांनी दिले नाहीत. त्यांना आता आधारमध्ये असलेले नाव, पत्ता, जन्मतारीख, वय, लिंग, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आदी अद्यावत करावे लागेल. तसेच डोळयांची बुबुळे, बोटांचे ठसे, चेह-याचे सुधारित छायाचित्र द्यावे लागणार आहे.आधार कार्ड काढल्यानंतरही दर 5 ते 10 वर्षांनी आधार कार्ड अद्यावत करावे लागते. विशेषतः घराचा पत्ता बदललेला असेल तर किंवा लहान मुलांचे आधार कार्ड काढल्यानंतर त्यांना पाच वर्षांनी अपडेट करणे आवश्यक आहे. बोटांचे ठसे, फोटो, बदललेला मोबाईल क्रमांक आदींमध्ये बदल करता येतो.

पहिल्यांदा आधार कार्ड काढत असाल तर

पहिल्यांदा आधार कार्ड काढत असाल तर संबंधित केंद्राकडे आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतात. मुलाचे आधार कार्ड काढायचे असेल तर वडिलांचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, शाळेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने मुलांच्या आधार कार्डाबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. प्राधिकरणाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांच्या आधार डेटामध्ये बायोमेट्रीक तपशील अपडेट करणे बंधनकारक असून, ही प्रक्रिया निःशुल्क आहे. यासाठी जन्म प्रमाणपत्र, मार्क शीट्स, ओळखीचा पुरावा, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आदी वैध ओळपत्र आवश्यक आहे.

आधार कार्ड काढून घ्यावे

जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी अद्याप आधार कार्ड काढले नसतील त्यांनी आपल्या नजीकच्या आधार केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड काढून घ्यावे. तसेच ज्या नागरिकांचे आधार कार्ड काढलेले आहे. अशा नागरिकांनी आपले आधार अपडेट करुन घ्यावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आधार नोडल अधिकारी शमा पवार यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here