Aadhaar Card: या तारखेपर्यंत आधार कार्डची माहिती मोफत अपडेट करता येणार

0

मुंबई,दि.12: Aadhaar Card: केंद्र सरकारने आधार कार्डधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची 14 मार्च शेवटची तारीख होती. सरकारने आता मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे दस्तावेज मानले जाते. ट्रेनची तिकीट काढायची असेल किंवा सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड अनिवार्य असते.

तुम्ही मागच्या 10 वर्षापासून आधार कार्ड अपडेट केले नसेल तर लवकरात लवकर करुन घ्या. ऑनलाइन माध्यमातून केलात किंवा आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट केलात तर तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागते. असे असले तरी यूआयईडीएआय युजर्सना मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची संधी देत आहे.

आधार अपडेट करण्याची मुदत 14 मार्चहून 14 जून, 2024 रोजीपर्यंत वाढवली आहे. आता देशातील कोट्यवधी लोकांना 4 महिन्यांचा कालावधी वाढून मिळाला आहे. समाज माध्यम X वर UIDAI ने याविषयीची पोस्ट केली आहे. युआयडीएआयने लाखो आधार कार्डधारकांना लाभ मिळण्यासाठी फ्री ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा 14 जून 2024 रोजीपर्यंत वाढवली आहे.

ही मोफत सेवा केवळ myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा अधिक जुने असेल आणि अजून ते अपडेट केले नसेल तर ही संधी उपलब्ध झाली आहे.

असे करा आधार अपडेट | Aadhaar Card

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर https://myaadhaar.uidai.gov.in/ जा.

यानंतर तुमचा आधार नंबर टाका. आता तुम्हाला एक ओटीपी येईल. 

पुढे जाऊन डॉक्युमेंट्सवर क्लिक करावे लागेल. आणि व्हेरिफाइडवर क्लिक करावे लागेल. 

यानंतर ड्रॉप लिस्टमध्ये आयडी आणि पत्त्याचा पुरावा असलेला फोटो अपलोड करा.

सबमिटवर क्लिक केल्यानंतर रिक्वेस्ट नंबर मिळेल. 

आता रिक्वेस्ट नंबरवरुन आधार अपडेट स्टेटस तपासू शकता.

तुमचे आधार कार्ड काही दिवसातच अपडेट होईल.

आधार कार्डमधील हा बदल केवळ ऑनलाईन अपडेशनसाठी आहे. पण तुम्ही आधार केंद्रावर जाऊन कागदपत्रांआधारे आधार कार्डमध्ये बदल कराल तर त्यासाठी 25 रुपये शुल्क अदा करावे लागेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here