सोलापूर,दि.२: श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराच्या गाभारा नूतनीकरणामुळे मंदिराच्या वैभवात भर पडली असल्याचे प्रतिपादन मराठी चित्रपट अभिनेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी व्यक्त केले.
बांदेकर यांनी मंदिरात येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने प्रथमेश इंगळे (Prathamesh Ingale) यांनी त्यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.
कोणत्याही क्षेत्रात माणूस कोणतेही काम करीत असो त्यावेळी मी करतो असे म्हणण्यापेक्षा स्वामी करवून घेतात असे भाव मनी बाळगल्यास माणसाला यश अपयशाची चिंता वाटणार नाही. प्रत्येकाने कर्म करावे, निर्णय स्वामींवर सोडावा यामुळे जीवनात प्रत्येकास स्वामी कृपेने यश येईल.
यावेळी मंदिर समिती सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, संतोष जमगे, शिवशरण अचलेर, दर्शन घाटगे, गिरीश पवार, सागर गोंडाळ, श्रीकांत मलवे उपस्थित होते.