मुस्लीम महिला देणार भगवान श्रीराम यांना अनोखी भेट

0

मुंबई,दि.3: श्रीराम मंदिरासाठी मुस्लीम महिला अनोखी भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, चित्रपट अभिनेते श्रीराम प्राण प्रतिष्ठापणावेळी उपस्थित राहणार आहेत. देशभरातून भक्त अयोध्येला जाणार आहेत. भगवान श्रीराम यांचे भव्य नि दिव्य मंदिर पाहण्यासाठी व दर्शनासाठी अनेकजण उत्सुक आहेत. सर्व धर्मातील लोक या सोहळ्यासाठी तयारी करत असल्याचे दिसून येते.

तलाक पीडित मुस्लीम महिलाही भगवान श्रीराम यांच्याकरिता अनोखी भेट आणणार आहेत. यासाठी या महिला परिश्रम घेत आहेत. तिहेरी तलाक पीहित महिला 26 जानेवारीनंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचणार आहेत. आपल्या हाताने विणलेली वस्त्र या मुस्लीम महिला भेट देणार आहेत. ही वस्त्र संपूर्णपणे रत्न जडीत असणार असून याची जोरदार तयारी सुरु आहे.

जोरदार तयारी


तिहेरी तलाक पीडित मुस्लीम महिला रामलल्लासाठी रत्नजडीत वस्त्र भेट देणार आहेत. ही वस्त्र संपूर्णपणे मोत्यांनी जडलेली असणार आहेत, यासाठी या महिलांनी देणगीचं आवाहनही केलं आहे. आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या महिला बरेली, बदायूं, रामपूर, मुरादाबाद, मेरठ, प्रयागराजसह 30 जिल्ह्यांमधून देणगी गोळा करत आहेत. रत्नजडीत वस्त्र बनवण्यासाठी खास कारागिरांवर कामगिरी सोपवण्यात आली आहे. याशिवाय देणगीतून जी रक्कम उरेल ती राम मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द केली जाणार आहे. हिंदू समाजाने आम्हाला ईदगाहसाठी जमीन दान केली, तर आम्ही राम मंदिराच्या उभारणीत सहकार्य का करू शकत नाही? अशी भावना या महिलांना व्यक्त केली आहे.

या महिला 26 जानेवारीनंतर रामलल्लाच्या दर्शनसाठी अयोध्येत दाखल होणार आहेत. यावेळी त्या आपल्या हाताने रत्नजडीत वस्त्र भेट देणार आहेत. रामलल्लासाठी बनवण्यात येणारी ही रत्नजडीत वस्त्र बरेलीतल्या प्रसिद्ध कारागिरांकडून बनवली जात आहेत. ही वस्त्र आपल्या हाताने रामलल्लाला भेट देण्याची इच्छा या महिलांनी व्यक्त केली असून त्यांनी राम मंदिर ट्रस्टला विनंती केली आहे. या सर्व महिला ‘मेरा हक फाऊंडशेन’शी संबंधीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here