इमारतीला लागली भीषण आग, 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू

0

छत्रपती संभाजीनगर,दि.3: महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. संभाजीनगर येथील छावणी परिसरात असलेल्या एका घराला रात्री आग लागली. आग इतकी भीषण होती की, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत झालेल्या 7 जणांमध्ये 3 महिला, 2 मुले आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. इमारतीला आग लागली तेव्हा कुटुंब झोपले होते. सध्या सर्व मृतदेह छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

शासकीय रुग्णालयाबाहेरही लोकांची गर्दी दिसून येत आहे. ज्या इमारतीत आग लागली ती तीन मजली इमारत असून तळमजल्यावर कपड्यांचे दुकान होते, ज्यामध्ये आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीमुळे वरच्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबाचा गुदमरून मृत्यू झाला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here