मुंबई,दि.१: दोन संघांमध्ये क्रिकेटच्या मैदानात तुफान हाणामारी झाली. क्रिकेटच्या मैदानात एखादा राडा होणं तसं दुर्मिळ आहे. एखाद दोन खेळाडू कधी भिडले तर भिडले. अन्यथा कधीच तसं चित्र पाहायला मिळत नाही. त्यामुळे हाणामारी झाली तर ती दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये होते. पण बांगलादेशमध्ये सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं.
या स्पर्धेत मुस्तफा कमाल रियाज आणि दीपांकर दीपन या दोन संघात सामना सुरु होता. या दरम्यान दोन्ही संघांमध्ये एका निर्णयामुळे वाद झाला आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये जोरदार हाणामारी झाली. हे दृष्य पाहून नेमकं हे क्रिकेटचं मैदाना आहे की, डब्ल्यूडब्ल्यूई आखाडा असा प्रश्न उपस्थित प्रेक्षकांना पडला होता. हे प्रकरण इतकं वाढलं की स्पर्धाच रद्द करावी लागली. या हाणामारीत सहा जण जखमी झाले आहेत. इतकंच काय तर मुलं आणि मुली दोघंडी भिडले.
यामुळे झाला वाद
रिपोर्टनुसार, सामन्यात हाणामारी पंचांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे झाली. या सामन्यात मुलं आणि मुली पंचांनी चौकार न दिल्याने समोरासमोर उभे ठाकले. त्याचबरोबर फलंदाजाला बाद दिल्याने हा वाद आणखी चिघळला. वाद इतका टोकाला गेला की हातात बॅट घेऊन मारण्याचा प्रयत्न झाला. शेवटी इतकं मोठा वाद पाहता ही स्पर्धाच रद्द करण्यात आली आहे.
क्रिकेट मैदानात यापूर्वी असं कधीच झालं नाही. जास्तीत दोन ते तीन खेळाडू भिडल्याचं चित्र पाहिलं गेलं आहे. इतका वाद टोकाला जाणं गल्ली क्रिकेटमध्ये फार फार तर झाला असेल. दुसरीकडे हे काही प्रोफेशनल क्रिकेटर नव्हते. पण बांगलादेशमधील सेलिब्रिटी आहेत. या हाणामारीनंतर सामन्यातील मुलींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात मुलगी फलंदाजाने चौकार मारला पण दिला नसल्याचा आरोप करत आहे.