कोव्हिशिल्ड व्हॅक्सीनचे साइड इफेक्ट प्रकरण सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

0

नवी दिल्ली,दि.2: कोव्हिशिल्ड व्हॅक्सीनचे साइड इफेक्ट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. जगातील अनेक कंपन्यांनी कोविडची लस बनवली आहे. त्यापैकी एक कंपनी AstraZeneca होती. Covishield नावाची कोरोना लस तयार करणाऱ्या AstraZeneca ने कबूल केले आहे की तिच्याद्वारे बनवलेल्या लसीमुळे लोकांवर काही दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे रक्त गोठण्याची शक्यता असल्याचे कंपनीने म्हटले आहे. हे लक्षात घेण्याजोगे आहे की कोविशील्डचे 1 अब्ज 70 कोटी डोस भारतात दिले गेले. 

कोरोनाचे औषध बनवणारी ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca ने आपल्या कोविड-19 लसीमुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात हे प्रथमच मान्य केले आहे. AstraZeneca ने UK उच्च न्यायालयात कबूल केले की कोविड-19 लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) सारखे दुष्परिणाम होऊ शकतात. आता हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.

हेही वाचा Covishield चे दुष्परिणाम, लस घेणाऱ्यांना किती धोका?

धोके आणि साइडइफेक्टची चाचपणी व्हावी

कोव्हिशिल्ड व्हॅक्सीनचे साइड इफेक्ट प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील विशाल तिवारी यांनी एक याचिका दाखल केली आहे. कोर्टाने एम्सच्या डायरेक्टरच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांचे एक पॅनेल स्थापन करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकेत केली आहे. या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत न्यायाधीश यांच्या निगराणीखाली कोव्हिशिल्डमुळं निर्माण होणारे धोके आणि साइडइफेक्टची चाचपणी व्हावी, असं देखील याचिकेत म्हटलं आहे. 

कोरोना साथीच्या काळात कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर गंभीर अपंगत्व आलेल्या किंवा मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना नुकसानभरपाई देण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. . प्लेटलेटस घटणे किंवा रक्तात गुठळ्या हे धोके आणि लस यांचा संबंध असल्याचे ‘अॅस्ट्राझेनेका’ने मान्य केल्याचा दावा याचिकेत केला आहे. भारतात या लशीची निर्मिती पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट’ने केली होती आणि तिच्या 175 कोटी मात्रा देण्यात आल्या होत्या, असे याचिकेत म्हटले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here