एक व्यक्ती चालवत आहे हटके प्रकारची बाईक, व्हिडीओ व्हायरल

0

सोलापूर,दि.2: एक व्यक्ती हटके प्रकारची बाईक चालवत आहे. सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर निरनिराळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक विचित्र, मजेशीर, धक्कादायक, भावुक, आश्चर्यकारक करणारे फोटो, व्हिडीओ समोर येतात. आपण विचारही करु शकत नाही अशा गोष्टी लोक करतात आणि प्रसिद्धी झोतात येतात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एक व्यक्ती हटके प्रकारची बाईक चालवत आहे. ही बाईक पाहून तुम्हीही बुचकळ्यात पडाल की, ही बाईक नेमकी कशी आहे.

तुम्ही कधी विना चाकांची गाडी पाहिलीय का? सध्या समोर आलेल्या व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला विना चाकांची गाडी दिसेल. अशी गाडी तुम्ही कदाचित पहिली पाहिली असेल. मात्र नीट पाहिल्यावर तुम्हाला या गाडीचं सत्य समजेल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्यक्तीने विचित्र पोशाख घातला आहे आणि तो आनंदाने रस्त्यावर बाइक चालवत आहे. व्हिडीओ पाहताना तु्म्हाला गाडीला चाकच दिसत नाहीत. मग विना चाकांची ही गाडी चालतेय कशी. नीट पाहिल्यावर तुम्हाला समजेल की ही बाईक काचेने झाकून अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे. जेणेकरून त्याची चाके लोकांना दिसणार नाहीत. आणि व्यक्तीचा पोशाखही हटके विचित्र आहे.

खरंतर, हॅलोविन सणाच्या दिवशीचा हा व्हिडीओ आहे. व्यक्तीने हा हटके लुक खास हॅलोविनसाठी तयार केला आहे बाईकसह. दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी हॅलोविन सण साजरा केला जातो. यादिवशी लोक वेगवेगळे पोशाख घालतात.

@latestinspace नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 5 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला. व्हिडीओवर भरपूर लाईक्स आणि कमेंट पहायला मिळत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here