मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया या नवीन चिनी बॅक्टेरियाने भारतात केली एन्ट्री

0

नवी दिल्ली,दि.७: मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया या नवीन चिनी बॅक्टेरियाने भारतात एन्ट्री केला आहे, ज्याचा परिणाम लहान मुलांवर होत आहे. कोरोना पूर्णपणे संपलेला नसतानाच चीनमधून आलेल्या एका नवीन बॅक्टेरियामुळे भारतातील टेन्शन वाढलं आहे. मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया या नवीन चिनी बॅक्टेरियाने भारतात एन्ट्री केला आहे, ज्याचा परिणाम लहान मुलांवर होत आहे. या आजाराने चीनमध्ये कहर केला आहे.

दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाची सात प्रकरणे आढळून आली आहेत. य़ामुळे सर्वांचीच चिंता वाढली.

AIIMS ने PCR आणि IDM-ELISA या दोन चाचण्यांद्वारे चीनमध्ये मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया या लहान मुलांमध्ये श्वसनाचे आजार निर्माण करणार्‍या बॅक्टेरियाची सात प्रकरणे नोंदवली आहेत.

पीसीआर आणि आयजीएम एलिसा चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट तीन आणि 16 टक्के असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळेच चीनमधून आलेल्या कोरोनाचा सामना केल्यानंतर आता भारतात या आजाराची भीती पसरू लागली आहे. पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

रिपोर्टनुसार, भारतात मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया शोधण्यासाठी पाळत ठेवण्याची गरज आहे. एम्स दिल्लीने या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान चीनमध्ये पसरलेल्या मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाच्या सात प्रकरणांची तपासणी केली आहे.

लॅन्सेट मायक्रोबमध्ये प्रकाशित झालेल्या या अहवालात असे म्हटले आहे की संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पीसीआर चाचणीद्वारे एक प्रकरण आढळले होते तर उर्वरित सहा प्रकरणे IGM ELISA चाचणीद्वारे आढळून आली होती.

चीन आणि इतर अनेक युरोपीय देशांमध्ये ‘वॉकिंग न्यूमोनिया’च्या घटनांमध्ये वाढ होत असताना हे घडले आहे. भारतात त्याची प्रकरणे आढळून आल्याने चिंता वाढली आहे कारण चार वर्षांपूर्वी डिसेंबर 2019 मध्ये कोरोना चीनमधून सुरू झाला आणि जगभरात पसरला.

एम्स दिल्लीच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे माजी प्रमुख आणि कन्सोर्टियमचे सदस्य डॉ. रामा चौधरी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया हे 15-20% कम्युनिटी एक्वायर्ड निमोनियाचं कारण मानलं जातं.

मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाचा संसर्ग सामान्यतः लहान मुलं आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना प्रभावित करतो, परंतु तो कोणालाही प्रभावित करू शकतो. गर्दीच्या ठिकाणी राहणाऱ्या आणि संसर्ग प्रवण भागात राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या लोकांना जास्त धोका असतो.

ज्या मुलांना मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाचा संसर्ग आहे त्यांच्यामध्ये सहसा काही सामान्य लक्षणं असतात. ज्यामध्ये घसा खवखवणं, थकवा जाणवणं, ताप, खोकला आणि डोकेदुखी याचा समावेश आहे. अशी लक्षणं आढल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here